…अखेर रिया चक्रवर्ती चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल

सीबीयाकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा दाखल

0

मुंबई : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाने एक नवे वळण घेतले आहे. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तपासाच्या दुहेरी कचाट्यात सापडली. सीबीयाकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून ‘ईडी’कडूनही रियाची चौकशी आज करण्यात येणार आहे.
रिया चक्रवर्ती या चौकशीसाठी उपस्थित राहणार की, नाही? यावरून अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत होत्या. अशातच रिया चक्रवर्तीने चौकशीसाठी ‘ईडी’च्या कार्यालयात हजेरी लावली आहे. दरम्यान, ‘ईडी’ने समन्स बजावल्यानंतर कोरोना होण्याच्या भीतीमुळे रिया चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात होते. रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी ‘ईडी’कडे विनंती केली होती की, उच्च न्यायालयात सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी सुनावणी सुरू आहे. तोपर्यंत याप्रकरणी ‘ईडी’ने रियाची चौकशी करू नये. परंतु, ‘ईडी’ने रियाच्या वकिलांचा विनंती अर्ज फेटाळला. 12 वाजता ‘ईडी’ने रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावले होते. त्यासाठी रिया ‘ईडी’ कार्यालयात आपला जबाब नोंदवण्यासाठी पोहोचली आहे.
‘ईडी’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या चौकशीदरम्यान याप्रकरणी ज्या बाबी समोर आल्या आहेत. त्या आधारावर ‘ईडी’ने याप्रकरणी रियाच्या चौकशीसाठी प्रश्नावली तयार केली आहे. ज्यामध्ये 3 टप्प्यांमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. याप्रश्नांमधील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की, सुशांतने आपली बँक खाती ऑपरेट करण्याचा अधिकार रियाला दिला होता? दरम्यान, चौकशी दरम्यान, खुलासा झाला आहे की, काही दिवसांपूर्वीच रिया चक्रवर्तीने खारमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.