भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल

सावरगाव घाटच्या ऑनलाइन दसरा मेळाव्यात आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन

0

बीड  : सावरगाव घाट येथील ऑनलाइन दसरा मेळाव्यात सोशल डिस्टंसिंग न पाळल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात  आले आहे. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याविरोधात अमळनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावरगाव घाट काल (25 ऑक्टोबर) येथील भगवान भक्ती गड येथे पंकजा मुंडे यांनी ऑनलाईन दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. कोरोना महामारीमुळे मेळाव्यासाठी कोणीही हजर राहू नये, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले होते. त्यामुळे गावातील लोकांशिवाय बाहेरचे फारसे लोक या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते मात्र पंकजा मुंडे याच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कोणतेही सोशल डिस्टंसिंग पाळले नाही. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात दिलेल्या नियमांचे पालन त्यांनी केले नाही,  भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याविरोधात अमळनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महादेव जाणकर, खासदार भागवत कराड यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. पाथर्डीच्या आमदार मोनिका राजुरे, जिंतूरच्या बोर्डीकर, भीमराव धोंडे, सविता गोल्हार, विजय गोल्हार, सुवर्णा लांरुड, राजेंद्र सानप, संदेश सानप, राजाभाऊ मुंडे यांसह 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.