‘सिटी सेंटर मॉल’ला भीषण आग; अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी

नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलच्या आगीत अडकलेल्या ५०० पेक्षा अधिक लोकांची सुटका

0

मुंबई : नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलला भीषण आग लागली. गुरूवारी रात्री ९ च्या सुमारास  मॉलला भीषण आग लागली. आतापर्यंत तब्बल ५०० लोकांपेक्षा जास्त जणांची सुटका करण्यास प्रशासनाला यश मिळाले. गेल्या ११ तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलला भीषण आग लागली.  दुसऱ्या मजल्यावरील मोबाईलच्या दुकानाला लागलेल्या आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. सिटी सेंटर मॉल तीन मजल्याचा आहे. मोबाईल शॉपला आग लागल्यामुळे तिसऱ्या मजल्यावर देखील आग लागली. २०० पेक्षा जास्त दुकानांना आगीचा फटका बसला आहे. यामध्ये मोबाईलच्या दुकानांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोट्यवधीचे नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.  या बचाव कार्यामध्ये अग्निशामन दलाचे दोन कर्मचारी मात्र जखमी झाले आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २४ गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या आहेत. शिवाय ६ वॉटर टँकर ६ रुग्णवाहिकादेखील घटनास्थळी दाखल करण्यात आल्या आहेत. सुमारे २५० आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मॉलला लागलेली आग अत्यंत भीषण असल्यामुळे मुंबईच्या सर्व अग्निशमन दलाच्या केंद्राकडून गाड्या मागवण्यात आल्या आहेत. प्रसंगी काही खासगी यंत्रणा देखील मदतीसाठी पुढे आल्या आहेत. या आगीमुळे मॉलचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुसऱ्या मजल्यावरील मोबाईलच्या दुकानाला लागलेल्या आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. सिटी सेंटर मॉल तीन मजल्याचा आहे. मोबाईल शॉपला आग लागल्यामुळे तिसऱ्या मजल्यावर देखील आग लागली. २०० पेक्षा जास्त दुकानांना आगीचा फटका बसला आहे. यामध्ये मोबाईलच्या दुकानांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोट्यवधीचे नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, आग विझवण्याच्या कामामध्ये अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. आगीची तीव्रता लक्षात घेता बेलसिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.