मळणी यंत्रात केस आणि पदर अडकल्याने महिला मजूरचा जागीच मृत्यू

माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी गावातील धक्कादायक घटना

0

सोलापूर : माढा येथे सोयाबीनची काढणी सुरू असताना मळणी यंत्रात महिला मजूरचे केस आणि पदर अडकल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन महिला मजुरीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी गावात घडली आहे.

माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी गावात घडली. शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विमल विलास आतकरे (वय-४८)असे त्या मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील विष्णू दळवी यांच्या शेतात बाबासाहेब उदंगेचे मळणी यंत्र सोयाबीन काढण्यासाठी आणले होते. मजुरी काम करण्यास आलेल्या आतकरे या सोयाबीन टाकण्याचे काम करत असताना त्यांचे केस व साडीचा पदर मशिनच्या शॉफ्टमध्ये अडकले. मशिनमध्ये आतकरे ओढल्या गेल्या आणि क्षणार्धात  होत्याचे नव्हते झाले. यात डोक्याचा चेंदामेंदा होऊन महिलेचा जागीच  मृत्यू झाला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.