मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी पाचोड येथील मोबाईल टॉवरवर चढून उपोषण

टॉवरवर चढून उपोषण, टॉवरवरूनच व्हिडिओ केला जारी; औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील प्रकार

0

औरंगाबाद  : मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने  दिलेली स्थगिती उठवावी आणि मराठ आरक्षणासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड येथील छावा क्रांतिवीर सेनाचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत भुमरे  यांनी आज सकाळी 9 वाजता पाचोड येथील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करत आहे.  तरुणाकडून शोले स्टाइल उपोषण करण्यात येत आहे. .

मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने  दिलेली स्थगिती उठवावी आणि मराठ आरक्षणासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी तरुणाकडून शोले स्टाइल उपोषण करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड येथील छावा क्रांतिवीर सेनाचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत भुमरे आज सकाळी 9 वाजता पाचोड येथील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करत आहे. दरम्यान स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून युवकाने खाली उतरावे यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण स्थगिती दिली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवावी तसेच हा प्रश्न सुटेपर्यंत सर्व विभागाच्या नोकरभरतीला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी आज सकाळी 9 वाजेपासून मोबाईल टॉवरवर बसून आमरण उपोषण सुरू केले आहे. भुमरे यांनी टॉवरवरूनच व्हिडिओ जारी करत जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी खबरादारीचा उपाय म्हणून पाचोड पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.