उदया प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा; परेड संपल्यावर कडक सुरक्षेत ट्रॅक्टर मोर्चा

शेतकरी मोर्चात गोंधळ घालण्याकरिता पाकिस्तानने ३०० ट्विटर हँडल तयार

0

नवी दिल्ली :दिल्लीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी मोर्चा सुरू आहे. आता उद्या म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे. या मोर्चात गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानने ३०० ट्विटर हँडल तयार केले आहेत. ट्रॅक्टर मोर्चाबद्दल माहिती देताना विशेष पोलिस आयुक्त (गुप्तचर यंत्रणा) दीपेंद्र पाठक यांनी प्रजासत्ताक दिनाचे सेलिब्रेशन संपल्यानंतर कडक सुरक्षेत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल, असे सांगितले.

“लोकांची दिशाभूल करत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात गोंधळ घालण्यासाठी १३ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान पाकिस्तानातून जवळपास ३०० ट्विटर हॅण्डल्स तयार करण्यात आली आहेत. याबद्दल इतर यंत्रणांकडून माहिती मिळाली आहे. आमच्यासाठी हे मोठे आव्हान असणार आहे. मात्र तरीही प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत मोर्चा काढला जाईल,” अशी माहिती दीपेंद्र पाठक यांनी दिली आहे.“पाकिस्तानमधील दहशतवादी काहीतरी मोठी समस्या निर्माण करू शकतात, असा धोका आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाकिस्तानमधील ३०८ ट्विटर हॅण्डल्स Farmer Protest, Tractor Rally संबंधित हॅशटॅगचा सतत वापर करत आहेत,” असे त्यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.