प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक

कमल हसनने बालासुब्रमण्यम यांच्या कुटुंबियांची घेतली भेट

0

चेन्नई : प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. बालासुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे. मात्र, गेल्या 24 तासात त्यांची प्रकृती नाजूक झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

बालासुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाल्याने 5 ऑगस्ट रोजी चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. मात्र, गेल्या 24 तासांत बालासुब्रमण्यम यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. बालासुब्रमण्यम यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समजल्यानंतर अभिनेता कमल हसन एमजीएम रुग्णालयात दाखल झाला. कमल हसनने बालासुब्रमण्यम यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. रुग्णालयात बालासुब्रमण्यम यांच्या नातेवाईकांना भेटल्यानंतर कमल हसनने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्णालयातील डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे”, अशी माहिती कमल हसनने दिली. एसपी बालासुब्रमण्यम यांनी स्वत: गेल्या महिन्यात फेसबुकवर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या मित्रांना फोन न करण्याची विनंती केली होती. याशिवाय दोन-चार दिवसांत डिस्चार्ज मिळेल, असेदेखील ते म्हणाले होते. “गेल्या दोन-तीन दिवसांपासून छातीत दुखत होते. याशिवाय थोडा खोकलाही येत होता. त्यानंतर थोडा तापही आला. त्यामुळे मी डॉक्टरांकडे गेलो. तिथे गेल्यावर मला माहिती पडले की, माझ्यात कोरोनाची सूक्ष्म लक्षणे आहेत. डॉक्टरांनी मला होम आयसोलेशनचा सल्ला दिला होता. पण मी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. माझ्या कुटुंबातील सदस्य खूप चिंता करत आहेत”, असे बालासुब्रमण्यम म्हणाले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.