सांगलीतील शिराळा वनविभागाच्या मजुरांची पिळवणूक

शासन नियमाप्रमाणे 9,650 रुपये पगार असताना, हातात फक्त 6 हजार रुपये देत असल्याचा आरोप

0

सांगली : जिल्ह्याच्या शिराळा येथील प्रादेशिक वनविभागात मजुरांची पिळवणूक होत असून वनविभाग कमी पगार देत असल्याचा आरोप होत आहे. शासन नियमाप्रमाणे 9650 रुपये पगार असताना, हातात फक्त 6 हजार रुपये दिले जात असल्याचा आरोप वनविभागातील मजुरांनी केला आहे. याविरोधात आज (2 नोव्हेंबर) वनपाल, वनमजूर जनरल युनियनने वन संरक्षक कार्यालयासमोर आंदोलन केले.

शिराळा वनविभागात काम करणारे 30 वन मजूर तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. हे सर्व मजूर 15 ते 20 वर्षांपासून वनविभागात कम करतात. शासन नियमाप्रमाणे मजुरांना 9650 पगार असताना, हातात मात्र 6 हजार रुपये दिले जात असल्याचा आरोप या मजुरांनी केला आहे. याविरोधात आज वन संरक्षक कार्यालयासमोर वनपाल, वनमजूर जनरल युनियनने आंदोलन केले. यावेळी आंदोलनादरम्यान वनविभाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच प्रशासनाचा निषेध करत आंदोलकांच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना भेटून पगारातील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच कामगारांचा पूर्ण पगार मिळावा, अशी मागणी वनपाल, वनमजूर जनरल युनियनने केली. तर, वन मजुरांच्या तक्रारीची दखल घेत चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन उप वनसंरक्षक प्रमोद धानके यांनी मजुरांना दिले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.