अतिवृष्टी, रोगाचा प्रादुर्भाव आणि आता शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट

मावा आणि करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने आधीच कांदा लागवडीवर परिणाम

0

नाशिक : येवला येथे अतिवृष्टीचा सामना केल्यानंतर वर्ष अखेर शेतकऱ्यांवर दुसरे संकट आले आहे. अवकाळी पावसाचा फटका कांदा पिकालाही बसला. मावा आणि करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने आधीच कांदा लागवडीवर परिणाम झाला आहे. त्यात अवकाळी पावसामुळं कांदा उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

दक्षिणेकडील अरबी समुद्रात तसेच हिंद महासागरामध्ये सुरू असलेल्या चक्रीवादळाचा थेट परिणाम कांदा उत्पादनावर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा येवला तालुक्यात ४० हजार हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड घटणार आहे. अवकाळी पावसामुळं अकराशे ते बाराशे कोटी रुपयांचा फटका कांदा उत्पादकांना बसणार आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच कांदा निर्यात खुली करावी, अशी मागणी केली जाते आहे. रोजच्या वातावरण बदलामुळे रोपे खराब होत आहेत. मावा आणि करप्या रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. परिणामी कांदा उत्पादक आणखीच मेटाकुटीस आले आहेत. कधी गारपीट, कधी धुके, कधी अवकाळी पाऊस… निसर्गाचा कोप काही केल्या थांबेना. अशा अस्मानी संकटाच्या काळात गरज आहे ती सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.