अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान, तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वाकी गावातील घटना

0

औरंगाबाद : औरंगाबादेतील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने त्याने आत्महत्या केली. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वाकी गावात ही घटना घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

औरंगाबादेतील तरुण शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने त्याने आत्महत्या केली. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वाकी गावात ही घटना घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. सुरेश रावसाहेब जंजाळ असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 37 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने आत्महत्या केली. काल (23 सप्टेंबर) दुपारी 2 वाजता त्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. काही दिवसांपासून राज्यात सतत पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गावोगावी शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पडलेला दुष्काळ, यंदा सततचा पाऊस यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. काही शेतकरी नापिकीला तर काही जणांना बँकेतील कर्ज फेडण्याची चिंता आहे. त्यात शेतमालालाही योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना मार्चमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले. तसेच अनेक पिकांवर रोगाचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे शेतकरी  आर्थिक संकटात सापडला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.