‘नीट’ परीक्षेचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता

निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर घोषित होऊ शकतो?

0

दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजेंसीकडून घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा 2020 चा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. नीटचा निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर घोषित होऊ शकतो. मात्र अजून या निकालाबाबत अधिकृत विभागाकडून कुठलीही माहिती दिलेली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार आज  एनटीए NEET UG-2020 परीक्षेचा निकाल हाती येऊ शकतो.
ज्या विद्यार्थ्यांनी NEET UG-2020  परीक्षा दिली होती ते एनटीए की ऑफिशियल वेबसाईट nta.ac.in आणि ntaneet.nic.in वर निकाल तपासू  शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असणार आहे. निकालासोबतच एनटीए आज नीट- 2020 परीक्षेची फायनल अंन्सर की देखील जाहीर करेल, असे बोलले जात आहे.लॉकडाऊनमुळं लांबलेली नीट 2020 ची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी पार पडली होती.  कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेत ही परीक्षा घेतली होती.   देशभरातील जवळपास 15 लाख विद्यार्थी ‘नीट’ मेडिकल प्रवेश परीक्षेला बसले होते.  महाराष्ट्रातील 2,28,214 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
नीट परीक्षेसाठी देशात 15.97 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची संख्या 2546 वरुन वाढवत 3843 इतकी केली होती. तर प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची संख्या 24 वरुन 12 करण्यात आली होती.
ही परीक्षा पुढं ढकलण्यासाठी पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड आणि  झारखंड राज्यातील सहा मंत्र्यांनी याचिका दाखल केली होती मात्र सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली होती. प्रत्येकवर्षी ही परीक्षा मे महिन्यात पार पडते. पण लॉकडाऊनळं यंदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली.  यावरून अनेकदा राजकारण ही रंगले, शेवटी न्यायालयाने परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब केला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.