गिरीश महाजनांविरुद्ध समर्थकांकडे पेनड्राईव्हमध्ये पुरावे; अडचणीत वाढ

गिरीष महाजन यांच्याकडून काही त्रास झाल्यास आपण ही सीडी जाहीर करू. - पारस ललवाणी

0

जळगाव : बीएचआर पतसंस्था अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीशी संबंधित कागदपत्रांनुसार जळगाव शहरातील खान्देश कॉम्प्लेक्सचा पत्ता असलेल्या श्री साई अँड ट्रेडिंग कंपनीच्या  बहुतांश मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ही कंपनी सूरज झंवर व कैलास रामप्रसाद सोमाणी यांच्या मालकीच्या आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले होते.

बीएचआर पतसंस्था  म्हणजेच भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीशी संबंधित कागदपत्रांनुसार जळगावमधील खान्देश कॉम्प्लेक्सचा पत्ता असलेल्या श्री साई अँड ट्रेडिंग कंपनीच्या बहुतांश मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ही कंपनी सूरज झंवर व कैलास रामप्रसाद सोमाणी यांच्या मालकीच्या आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले होते.  बीएचआर घोटाळाप्रकरणी सूरज यांचे वडील सुनील झंवर यांच्या ठिकाणांवर आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकले होते. झंवर हे जळगावातील मोठे व्यावसायिक आहेत. त्यानंतर बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने जामनेर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर जामनेरात दाखल होताच, पारस ललवाणी यांनी स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन गंभीर खुलासे केले होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आपल्याकडे गिरीश महाजन यांच्याविरोधातील पुराव्याची सीडी आणि पेन ड्राईव्ह आहेत. आणि योग्य वेळ आल्यावर उघड करू, असा गंभीर आरोप जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केला आहे. ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेत हा गंभीर आरोप केला. काही दिवसांपूर्वी विजय पाटील यांनीही गिरीश महाजन यांच्याविरोधात पुराव्याची सीडी असल्याचा दावा केला होता. त्यानंतर पारस ललवाणी यांनीही असाच दावा केला आहे. ”आपल्याकडे पुरावे असलेली सीडी आणि पेन ड्राईव्ह आहे. गिरीष महाजन यांच्याकडून काही त्रास झाल्यास आपण ही सीडी जाहीर करू. पुढील काळात सर्व सत्य समोर येईल,” असे ललवाणी म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.