लातूरला पाणीपुरवठा करणारे ‘मांजरा धरण’ भरले तरीही आठवड्यातून एकदा पाणी

कायम पाणीटंचाईचे चटके सहन करणारे शहर म्हणून लातूरची ओळख

0

लातूर :  लातूर शहराला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे लातूरकरांच्या पाण्याची चिंता मिटली होती. मात्र असे असूनही आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा सुरू आहे. कायम पाणी टंचाईचे चटके सहन करणारे शहर म्हणून लातूरची ओळख आहे.

२०१६ च्या दुष्काळात मांजरा धरण कोरडे ठाक पडल्यामुळे लातूरला चक्क रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला होता. यंदा वरूणराजा लातूरवर प्रसन्न झाला. यंदाच्या पावसात चांगला पाऊस झाला. त्यामुळे कधी नव्हे ते मांजरा धरणं १०० टक्के भरले.  शहरात दररोज किंवा दिवसाआड पाणी पुरवठा होईल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र पाणी पुरवठ्याची व्यवस्था तकलादू असल्यामुळे आणि त्याचसोबत जलशुद्धीकरण केंद्राची स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे उन्हाळा संपेपर्यंत लातूरकरांना आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा करण्यात येणारे. कृत्रिम पाणी टंचाईवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढतायत. मांजरा धरण साठ टक्के भरल्यानंतर लातूरकरांना दररोज पाणी पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र जलशुद्धीकरण केंद्राचे काम रखडल्यामुळे पुढील सहा महिने तरी लातुरकरांना आठवड्यातून एकदाच पाण्याचे दर्शन होणार आहे. आडातच नाही तर पोहऱ्यात कसे येणार असे म्हणण्याची वेळ लातूरकरांवर आलीय. त्यामुळे या कृत्रिम पाणी टंचाईतून लवकरात लवकर बाहेर काढण्याची मागणी जोर धरु लागलीय.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.