अमित शहांच्या ट्विटरवर प्रोफाईल फोटोऐवजी दिसला ‘एरर’ मॅसेज!

ग्लोबल कॉपीराइट पॉलिसीअंतर्गत नकळत चुकीमुळे हे अकाउन्ट काही काळापुरते लॉक, परंतु, नंतर ...

0

नवी दिल्ली :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अधिकृत ट्विटर अकाउन्टवर गुरुवारी फोटोऐवजी ‘एरर’चा मॅसेज दिसल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांसहीत अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अमित शहांच्या व्हेरिफाईड ट्विटर अकाउन्टवर डिस्प्ले पिक्चर (DP) च्या ऐवजी ‘Media not displayed. This image has been removed in response to a report from the copyright holder’ असा एरर मॅसेज दिसत होता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अधिकृत ट्विटर अकाउन्टवर गुरुवारी फोटोऐवजी ‘एरर’चा मॅसेज दिसल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांसहीत अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अमित शहांच्या व्हेरिफाईड ट्विटर अकाउन्टवर डिस्प्ले पिक्चर (DP) च्या ऐवजी ‘Media not displayed. This image has been removed in response to a report from the copyright holder’ असा एरर मॅसेज दिसत होता.मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरकडून अमित शहा यांचा प्रोफाईल फोटो ‘कॉपीराईट होल्डर’कडून रिपोर्ट करण्यात आल्यानंतर हटवण्यात आला होता. नंतर काही वेळाने अमित शहांचा फोटो पुन्हा त्यांच्या अकाउन्टवर दिसू लागला. हा फोटो ट्विटरने रिस्टोअर केला होता. ट्विटरकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘आमच्या ग्लोबल कॉपीराइट पॉलिसी अंतर्गत नकळत झालेल्या चुकीमुळे हे अकाउन्ट काही काळापुरते लॉक करण्यात आले होते. परंतु, नंतर लगेचच ही चूक सुधारण्यात आली आणि आता अकाउन्ट पुन्हा सुस्थितीत काम करत आहे’.’सामान्यत: एखाद्या फोटोवर फोटोग्राफरचा अधिकार असतो, फोटोमध्ये दिसणाऱ्या विषय किंवा व्यक्तीचा नाही’ असे ट्विटरच्या कॉपीराईट पॉलिसीमध्ये म्हटले गेले. याच घटनेशी मिळती जुळती घटना काही वेळेपूर्वी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या ट्विटर हॅन्डलसोबतही झाली होती. कंपनीने कॉपीराईटचे उल्लंघन असल्याचे सांगत बोर्डाच्या अकाउंटचा डिस्प्ले पिक्चर हटवला होता.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.