आमचा सरकारमध्ये समान अधिकार, औरंगाबादच्या नामांतराला विरोध, काँग्रेसने ठणकावले

शहराची नावे बदलून सर्वसामान्यांच्या जीवनात काही बदल झाला का? - बाळासाहेब थोरात

0

मुंबई : काँग्रेसचा कोणत्याही शहराच्या नामांतराला विरोधच आहे, महाविकास आघाडीचे ध्येय सर्वसामान्यांचे कल्याण करणे हेच आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात  यांनी स्पष्ट केले. नामांतर करुन वातावरण बिघडायला नको, अशी काळजी थोरातांनी व्यक्त केली.

औरंगाबादचे संभाजीनगर, असे नामांतर करण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे सरकारला आघाडीतील मित्रपक्षाकडूनच विरोध होताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज विमानतळाबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. आता केंद्र सरकार आणि भाजपची जबाबदारी आहे. शहराची नावे बदलून सर्वसामान्यांच्या जीवनात काही बदल झाला का? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला. सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या आनंदासाठी काम करावे, तेढ निर्माण करण्याचे काम नको. आमचा सत्तेत समान वाटा आहे. काँग्रेसचा कोणत्याही शहराच्या नामांतराला विरोधच आहे, महाविकास आघाडीचे ध्येय सर्वसामान्यांचे कल्याण करणे आहे, असे थोरातांनी स्पष्ट केले. तीन पक्षांमध्ये मतमतांतरे होऊ शकतात, पण याचा सरकारवर काहीही परिणाम नाही. चर्चेने सर्व प्रश्न सोडवू. संजय राऊत यांनी तिन्ही पक्ष एकत्र कसे राहतील, याची अग्रलेखातून काळजी घेतली, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांना पाठवत औरंगाबाद विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ असे नामांतर करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी काँग्रेसला औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? असा रोखठोक सवाल केला आहे. त्यामुळे शिवसेना औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरांची नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध

शिवसेनेच्या मागणीला राज्य सरकारमध्ये सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसने विरोध केला आहे. नाव बदलणे हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झाले आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.