निरंकारी मंडळातर्फे इंग्लिश मिडियम सत्संग सोहळा साजरा

0

औरंगाबाद :  सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असिम कृपेने झोनल इंग्लिश मिडीयम समागमाचे आयोजन संत निरंकारी मंडळ,शाखा-सिडको यांच्या तर्फे संत निरंकारी सत्संग भवन,एन-9, सिडको येथे करण्यात आले होते.
या समागमाची अध्यक्षता धिरज मल्होत्राजी,नेरुल (मुंबई) यांनी केली. तरुण पिढी मध्ये इंग्लिश भाषेचे महत्व बघता त्यांनी अध्यात्मिक जगतात देखील या भाषेचा सहारा घेऊन त्यांच्या मध्ये अध्यात्मिक जागृती निर्माण व्हावी हा या सत्संगाचा उद्देश होता यावेळी आपल्या विचारात महात्मा मल्होत्रा जी म्हणाले की,”आजच्या नवतरुणामध्ये संयम खुप कमी आहे.ज्या प्रमाणे फुलपाखरू आगोदर अळी स्वरुपात असतो,थोडं परिस्थितीशी झगडतो व नंतरच तो फुलपाखरू बनतो, त्याच प्रमाणे यशस्वी होण्यासाठी वेळ हा लागेलच आणि तुम्ही सुद्धा जरुर यशस्वी होताल.” या इंग्लिश मिडीयम समागमामध्ये युवा मुलांनी गित, कविता व नाटीका द्वारे मानवतेचा संदेश दिला.या समागमासाठी सिडको,औरंगाबाद, बजाजनगर,बाजारसावंगी,गोळेगाव, पैठण,सिल्लोड,शिवना,वाळुज, जालना,जामखेड आदी ठिकाणांहून 500 युवा मुला-मुलींनी सहभाग घेतला. या सत्संगच्या वेळी संत निरंकारी मंडळ,औरंगाबाद झोन प्रमुख कन्हैयालाल डेबराजी, सिडको शाखेचे मुखी डि.जी.दळवीजी, संत निरंकारी सेवादलचे क्षेत्रिय संचालक विजय बोडखेजी यांची प्रमुख उपस्थिती होती. या समागमाच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल,सिडको व औरंगाबाद यांनी परीश्रम घेतले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.