पुण्यात नेट, सेट, पीएचडीधारकांनी ‘या’ मतदानाविरोधात पुकारला एल्गार

नेट, सेट, पीएचडीधारक संघर्ष समितीचा निर्णय, प्राध्यापक कोणताही पर्याय न निवडता नोटाला मतदान

0

पुणे : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज भरायलाही सुरुवात झाली. सर्व पक्ष आपापल्या उमेदवाराला निवडूण आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच पुण्यातील नेट, सेट, पीएचडी धारकांनी मतदानाविरोधात एल्गार पुकारला आहे.

या निवडणुकीत सर्व प्राध्यापक कोणताही पर्याय न निवडता थेट नोटाला मतदान करणार असल्याचं नेट, सेट, पीएचडीधारक संघर्ष समितीने जाहीर केले आहे.मागील दहा वर्षांत पदवीधर आणि प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्यात पदवीधर आणि शिक्षकांचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत, असे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदा कोणताही पर्याय न निवडता आम्ही नोटा हा पर्याय स्वीकारणार असल्याचे नेट, सेट पीएचडीधारक संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश देवढे यांनी सांगितले. तसेच, या भूमिकेबद्दलचे पत्र थेट निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी मतदारसंघात नोटाला उच्चांकी मतदान झाले तर निवडणूकच रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयुक्तांनी केली आहे. नेट, सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या या भूमिकेमुळे पुण्यातील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार आहे. पुण्यात मनसेकडून रुपाली पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. तर अभिजीत बिचुकले यांनीदेखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून राज्यात एकूण 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर 2 जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) 1 तारखेला मतदान होईल तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.