शहरातील काही भागाची वीज गुरुवारी बंद

0

औरंगाबाद : महावितरणच्या बायजीपूरा उपकेंद्रातील रोहित्र बदलण्याच्या कामामुळे या उपकेंद्रातील वाहिन्यांवर असलेल्या वसाहतींचा वीजपुरवठा गुरुवारी (14 फेब्रुवारी) काही काळ बंद राहणार आहे.

११ केव्ही रोशनगेट, ११ केव्ही मोंढा, ११ केव्ही वॉटर वर्क फिडरवरील निझामुद्दीन, दर्गा रोड, चंपा चौक, मोंढा, जिन्सी, गंजेशाही, शहागंजचा काही भागाचा वीजपुरवठा फिडर सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत बंद राहील. तर सिडको फिडरवरील ३३/११ केव्ही रोशनगेट व ३३/११ केव्ही बायजीपुरा, वॉटर वर्क फिडरवरील संपूर्ण भाग सकाळी १० ते दुपारी 4 या वेळेत बंद राहील. वीजपुरवठा कामाच्या वेळेनुसार दिलेल्या वेळेपूर्वी किंवा नंतर पूर्ववत होऊ शकतो. तरी ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सध्या बायजीपुरा 33/11 केव्ही उपकेंद्रात 10 एमव्हीए क्षमतेचा जुना पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. मात्र या ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑईल गळती व तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे अखंडित वीजपुरवठ्यात अडथळे येत होते. त्यामुळे महावितरणने हा ट्रान्सफॉर्मर बदलून त्या जागेवर याच क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम गुरुवारी करण्याचे नियोजन केले आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर बसवल्यानंतर बायजीपुरा, शहा बाजार, राजाबाजार, चाऊस कॉलनी, कैसर कॉलनी, शहागंज, जाधवमंडी, जिन्सी, खास गेट, मोंढा, अहिंसानगर, मीना बाजार, नागसेन कॉलनी, अंगुरीबाग या परिसरात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा राहण्यास मदत होणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.