ईव्हीएमव्दारेच निवडणूका होणार, निवडणूक आयोगाचा निर्णय

0

ईव्हीएम मशीनचा वादा अद्याप संपणार नसल्याचे चिन्ह दिसत आहे. लोकसभा निवडणूका जशाजशा जवळ येत आहेत, तसेच ईव्हीएम मशीनचा वाद शिगेला पोहचत आहे. मागील दोन वर्षांपासून काँग्रेसने ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे काँग्रेससह इतर पक्षांनी मतपत्रिकेव्दारे मतदान घ्यावे, अशी मागणी केली. मात्र आगामी निवडणूका ईव्हीएम मशीनव्दारेच होणार असल्याचे ठाम मत निवडणूक आयोगाने व्यक्त केले आहे.

दिल्ली झालेल्या एका कार्यक्रमात मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले, मतपत्रिकेच्या युगात जाणे आता शक्य नाही. तसेच असा निर्णय घेणेही शक्य नाहीये. निवडणूक आयोग ईव्हीएमचाच वापर करणार आहे. गेल्या दोन दशकांपासून आम्ही ईव्हीएमचा वापर करत आहोत. त्यात आढळणा-या त्रुटी खूप कमी आहेत. भारतात जी पद्धत वापरली जाते ती आदर्श पद्धत आहे.

मागील आठवड्यात लंडनमध्ये हॅकर सय्यद शुजा याने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा होत असल्याचा दावा केला होता. त्या नंतर राजकिय पक्षांनी भाजपला धारेवर धरले होते. तसेच निवडणूकींमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर न करता मतपत्रिकेव्दारे मतदान घेण्याची मागणी राजकिय पक्षांनी केली होती.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.