गावची निवडणूक करा बिनविरोध, 25 लाखांचा मिळवा निधी; आमदार निलेश लंकेंची ऑफर

पारनेरच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्या म्हणून राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची अनोखी शक्कल

0

अहमदनगर : राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. कोरोनाच्या संकटात या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अनोखी शक्कल लढवली आहे.

गावांमधील निवडणुका बिनविरोध पार पाडा आणि 25 लाखांचा विकास निधी मिळवा, अशी घोषणाच निलेश लंके यांनी केली आहे. बिनविरोध निवडणुका करून शासनाचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली आहे.निलेश लंके हे पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात आणि शासनाचा खर्च वाचावा म्हणून लंके यांनी ही शक्कल लढवली आहे. तालुक्यातील जी गावे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पाडेल त्या गावाला 25 लाखांचा निधी देण्यात येईल, असे लंके यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयाची ग्रामस्थ अंमलबजावणी करतात का? हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी रोजी पार पडणार असून सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर होणार आहे. लंके यांच्या पारनेर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींचाही त्यात समावेश असून ज्या गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून शासनाच्या खर्च वाचवितील, गावातील एकात्मता कायम राखून प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या गावांना आमदार निधीतून २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा लंके यांनी केली आहे.

…असा आहे निवडणूक कार्यक्रम

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च 2020 मध्ये सुमारे 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार 17 मार्च 2020ला स्थगित करण्यात आल्या होत्या. आता निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबर 2020च्या आदेशान्वये एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार 1 डिसेंबर 2020 रोजी सुमारे 14234 ग्रामपंचायतींसाठी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, 7 डिसेंबर 2020पर्यंत त्यावर हरकती घेण्यात आल्या आहेत. 9 डिसेंबरच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदारयादी 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.