वयोवृद्ध शेतकऱ्याने पंकजा मुंडेंना पाहताच, फोडला हंबरडा, ताई आम्ही जगायचे…?

हतबल शेतकरी जेव्हा ये... ताई.. ये ताई.. पंकजाताईला मदतीसाठी मारतो आर्त हाक..!

0

नांदेड : लोहा तालुक्यातील पारडी येथे दुष्काळ पाहणी करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय सचिव पंकजा मुंडे नांदेड दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी नांदेड आणि लोहा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी त्यांनी केली.एका वयोवृद्ध शेतकऱ्याने पंकजा मुंडे यांना पाहताच, हंबरडा फोडला. आमचे सगळे वाहून गेले, आम्ही आता  जगावं  तरी कसं, असा सवाल या शेतकऱ्याने विचारला. पंकजा मुंडे यांनी देखील या शेतकऱ्याचं सांत्वन केले.

दुष्काळ पाहणी करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय सचिव पंकजा मुंडे नांदेड दौऱ्यावर आल्या होत्या. लोहामधील पारडी येथे एका वयोवृद्ध शेतकऱ्याने पंकजा मुंडे यांना पाहताच, हंबरडा फोडला. आमचे सगळे वाहून गेले ताई , आम्ही आता  जगावं  तरी कसं, असा सवाल या शेतकऱ्याने  पंकजा मुंडेंना विचारला. पंकजा मुंडे यांनी देखील या शेतकऱ्याचे सांत्वन केले.   यावेळी नांदेड आणि लोहा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी त्यांनी केली. बाजूच्या शेतात पाहणी करत असलेल्या पंकजा मुंडे यांना पाहून या शेतकऱ्याला रडू कोसळले. ताई इकडे या माझ्या शेतात बघा कसं नुकसान झाले आहे.  आता आम्ही काय करावे,,,  मूग, सोयाबीन, कापूस केला आमचे सगळं  वाहून गेलं.. आम्ही आता कसं जगायचं. असा प्रश्न वयोवृद्ध शेतकरी पांडुरंग पवार यांनी विचारला.. पंकजा मुंडे यांनी देखील या शेतकऱ्याला सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोपीनाथ मुंडे यांची आठवणदेखील शेतकऱ्यांनी काढली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.