एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अधिकृत घोषणा
मुंबई : भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे. ती चर्चा आज संपुष्टात आली असून खडसे शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. जयंत पाटील यांनी आज प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती दिली.
भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे. ती चर्चा आज संपुष्टात आली एकनाथ खडसे यांनी आज फोन करून भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत, असेही जयंत पाटील म्हणाले. आता फक्त त्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत, त्यांनाही काही दिवसात प्रवेश दिला जाईल, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षाकडून गेल्या साडेचार वर्षांपासून डावलल्यामुळे एकनाथ खडसे पक्षावर नाराज होते. विशेषत: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा विशेष राग आहे. पक्षातील केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांना भेटूनही उपयोग झाला नाही, याची त्यांना खंत आहे. विधानसभा, विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने आणि पक्षाच्या संघटनात्मक रचनेतही डावलले गेल्याने त्यांनी आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.