एकनाथ खडसेंची कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

रोहिणी खडसे यांनी 'त्या' कार्यकर्त्यांना केले आवाहन...

0

जळगाव : भाजपला सोडचिठ्ठी देऊन नुकत्याच भारतीय जनता पक्षात दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे  यांना कोरोनाची लागण झाली आहे.कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीनं जळगावमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रोहिणी खडसे यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्रकृती उत्तम आहे. मात्र, खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या सहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व स्वत:ची काळजी घ्यावी,’ असे आवाहन त्यांनी केले आहे. रोहिणी खडसे यांनीदेखील भाजपला सोडचिठ्ठी देऊन वडील एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे यामुळे उत्तर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा आहेत. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातही त्या सक्रिय आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्या निवडणूक रिंगणात होत्या. मात्र, शिवसेनेच्या उमेदवाराकडून त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता. एकनाथ खडसे यांच्यासोबत अलीकडेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

एकनाथ खडसेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी खान्देशात मोठी मजल मारेन

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एका मंदिराचे पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त अनिल देशमुख हे शहादा येथे आले होते. तेव्हा त्यांनी हे विधान केले होते. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना अनिल देशमुख म्हणाले, राज्यातील महाआघाडी सरकार नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पडणार, या फक्त वावड्या आहेत. महाविकास आघाडी सरकार अधिक मजबूत आणि स्थिर आहे. सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेन, असे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच गट-तट बाजूला ठेवून पक्ष वाढीच्या कामाला लागण्याचे आदेश देखील अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस येणाऱ्या काळात खान्देशात मोठी मजल मारेन, असा दावा राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.