एकनाथ खडसेंच्या गाडीचा धरणगाव – अमळनेर रस्त्यावर अपघात; खडसे सुखरुप

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारचे टायर फुटल्याची घटना

0

जळगाव  :  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसें यांच्या कारचा टायर फुटल्याची घटना धरणगाव ते अमळनेर रस्त्यावर घडली. कारचा टायर फुटल्यानंतर कार चालकाने वेगावर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. खडसे या अपघातातून बालंबाल बचावले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसें यांच्या कारचा टायर फुटल्याची घटना धरणगाव ते अमळनेर रस्त्यावर घडली. कारचा टायर फुटल्यानंतर कार चालकाने वेगावर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. खडसे या अपघातातून बालंबाल बचावले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात अमळनेर येथे पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांचे उद्घाटन तसेच एरंडोल पोलिस स्टटेशनच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे देखील देशमुख यांच्यासोबत होते. अमळनेर येथून कार्यक्रम आटोपल्यानंतर एकनाथ खडसे त्यांच्या (एमएच १९ सीई १९) क्रमांकाच्या कारने अमळनेर येथून जळगावकडे जात होते. धरणगावपासून ४ ते ५ किलोमीटर अंतरावर खडसेंच्या कारचा डाव्या बाजूचा पुढचा टायर अचानक फुटला. यानंतर कार चालकाने प्रसंगावधान राखत वेगावर नियंत्रण मिळवल्याने कार उलटली नाही. त्यामुळे सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती वार्‍याच्या वेगाने सर्वत्र पसरली. या घटनेसंदर्भात खडसे यांनी सांगितले की, अमळनेर येथून कार्यक्रम आटोपून जळगावच्या दिशेने जात असताना आमच्या कारचा पुढचा टायर अचानक फुटला. परंतु सुदैवाने कार उलटली नाही. या अपघातात कोणतीही दुखापत झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.