आयशर ट्रक आणि ट्रॅक्टर अपघातात एक जखमी

0

औरंगाबाद : ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि आयशर ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एक जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. ५) वाळूज जवळील टीसीआय ट्रान्स्पोर्टजवळ घडली. संतोष नामदेव शेजोळे (४५ रा. मुक्ताईनगर जळगाव) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अनिकेत ट्रान्स्पोर्टचा आयशर (ट्रक एम एच १२, के.पी ५१९९)  हा पंढरपुरकडून चाकणकडे भरधाव जात असताना वाळूज जवळील टीसीआय ट्रान्स्पोर्टकडून नगर महामार्गावर येणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टरला आयशर ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात ट्रकच्या समोरील भागाचा चुराडा झाला असुन, चालक संतोष शेजोळे हा जखमी झाला.

या अपघातामुळे ट्रॅक्टरमधील ऊस महामार्गावर पसरल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान वाळूज पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन आपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजुला करुन वाहतूक सुरळीत केली. मात्र या प्रकरणी बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.