जालना : राज्यात सध्या पदवीधर निवडणुकीचे घमासान सुरूच आहे. सगळ्या उमेदवारांनी आपापला जाहीरनामा जाहीर करत आहे . राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या ‘प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार प्रा. सचिन ढवळे यांनी सांगितले की, भारत हा तरुणांचा देश आहे. जगात सर्वात जास्त बेरोजगार तरुण आपल्या भारत देशात आहेत. भारतात सध्या जास्त बेकारीचे प्रमाण वाढत आहे.मराठवाड्यात तर त्याचे प्रमाण अधिक आहे.
उद्योग धंद्याचा अभाव, सततचा दुष्काळ, अशा अनेक कारणांनी मराठवाड्यात बेरोजगारी खूप वाढली आहे. आपल्याला पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यास तरुणांना काम व योग्य दाम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
शिवाय त्यांना उद्योग व्यवसायाकरिता लोन, एकाच दिवसात सर्व प्रकारचे परवाने (लायसन्स) मिळावे, याकरिता विधान परिषदेत आवाज उठवणार असल्याचेही प्रा.ढवळे यांनी सांगितले. ते म्हणाले की, या प्रस्थापित नेत्यांनी केवळ भूलथापा देऊन झुलवत ठेवले आहे. पदवीधर त्यांना केवळ मतदान व मतदार म्हणून वापरण्यापुरताच वाटतो आहे. परंतु सध्या सर्व सुशिक्षित पदवीधर प्रस्थापित आमदार तसेच धनदांडग्यांच्या विरोधात काम करीत असल्याचे चित्र दिसत असल्याचे मत त्यानी मांडले. तसेच प्राध्यापक ढवळे यांनी सांगितले की, आपल्याला कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. केवळ पदवीधरांचे असंख्य प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण पदवीधरांच्या इच्छेनुसार निवडणूक लढवत आहोत. ही निवडणूक माझी नसून समस्त मराठवाड्यातील गांजलेल्या, पिचलेल्या व अनेक वर्षांपासून प्रशासनाला कंटाळलेल्या सुशिक्षित सुसंस्कृत पदवीधरांची आहे. प्रा. सचिन ढवळे म्हणाले की, येणारे आगामी काळात शिक्षक भरती विरोधात आवाज उठवणार आहे. जुनी हक्क पेन्शन कर्मचार्यांसाठी आवाज उठविणार आहे.
प्रा.सचिन ढवळे सरांनी प्रचारात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे… प्रा.ढवळे या जालना येथे “पदवीधर परिवर्तन यात्रा” निमित्त आले होते. यावेळी जालना जिल्ह्यातील ‘प्रहार जनशक्ती पक्षा’चे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डीएड, बीएड असोसिएशन संघटनेने सरांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच कला -क्रीडा व अतिथी निदेशक यांनी सुद्धा प्रा.ढवळे यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनिशी उभे राहून त्यांच्या विजयाची ताकद आम्ही होऊ, असा शब्द दिला.