बाबा सिद्दीकींवर ईडीची कारवाई, एसआरए घोटाळ्याप्रकरणी संपत्ती केली जप्त

0

एसआरए घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकींना ईडीने मोठी कारवाई करून धक्का दिला आहे. शुक्रवारी (6 एप्रिल) वांद्रे येथील सिद्दींकी यांच्या कंपनीचे 33 फ्लॅट्स जप्त केले आहेत. तसेच त्यांची 462 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी ईडीकडे एसआरए योजनेत घोटाळा झाल्याची तक्रार केली होती. या योजनेत फेरफार करून सिद्दीकी आणि बिल्डरने बनावट कागदपत्रे बनवून घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. वांद्रे येथे पिरॅमिड डेव्हलपर्स या कंपनीची ही संपत्ती आहे.

ईडीने मागीलवर्षी या कंपनीच्या विविध संपत्तींची चौकशी केली होती. सिद्दीकी यांचा या संपत्तीशी संबंध दिसल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.