चांगल्या संस्काराबरोबर चांगली संतती कमवा, नक्कीच आपले जीवन सुखकर होईल !

भालगाव ग्रामस्थांच्या वतीने हभप. निवृत्ती महाराज वाडेकर यांचा सत्कार

0

करमाड  : औरंगाबाद तालुक्यातील भालगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील कीर्तनात ह.भ.प. निवृत्ती महाराज वाडेकर म्हणाले. आजकालच्या विज्ञान युगामध्ये विज्ञानाने प्रगती भरपूर केली; मात्र संस्कार नावाची गोष्ट लोप पावत चालली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे, यासाठी त्यांनी शपथ घेतली.

औरंगाबाद तालुक्यातील भालगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील कीर्तनात निवृत्ती महाराज वाडेकर म्हणाले, आजकालच्या विज्ञान युगामध्ये विज्ञानाने प्रगती भरपूर केली, मात्र संस्कार नावाची गोष्ट लोप पावत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे, यासाठी त्यांनी शपथ घेतली. याचे कारण म्हणजे जिजामातेने फक्त संपत्तीला महत्त्व दिले नसून चांगल्या संततीला महत्त्व दिले. त्यामुळेच हिंदवी स्वराज्य आपल्याला पाहावयास मिळाले. आताच्या युगातील सोळा वर्षांचा मुलगा गाणे म्हणतो ”सोळावे वरीस धोक्याचे”. त्यामुळेच आपण आपल्या भावीपिढीला चांगल्या संस्काराबरोबर चांगली संतती कमवा, त्यांना चांगले संस्कार द्या, नक्कीच आपले जीवन सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही, लहान मुलांच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा त्यांच्या हातात जर ज्ञानेश्वरी, गीता, रामायण, महाभारत, भागवत, गाथा हे ग्रंथ दिले तर नक्कीच त्यांचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जर आपल्या मुलाला लहान वयातच परमार्थ शिकवला नाही तर तुम्हाला ते म्हातारपणी वृद्धाश्रमात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, योग्य संस्काराअभावी भावीपिढीची घडी कोठेतरी बिघडत आहे. त्यामुळे समाजात व्यसनाधीनतेचे प्रमाणही वाढले. याकरिता आई-वडिलांनीच आपल्या मुलांना लहान वयातच योग्य संस्कार घडवणे गरजेचे आहे. तुमच्या मुलाला मोठा साहेब नाही बनवला तरी चालेल; मात्र त्याला समाजाच्या लायक माणूस नक्कीच बनवा, असा उपदेश त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. ह.भ.प. निवृत्ती महाराज वाडेकर औरंगाबाद तालुक्यातील भालगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील कीर्तनात केले. यावेळी भालगाव ग्रामस्थांच्या वतीने हभप. निवृत्ती महाराज वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गायनाचार्य गणेश महाराज ह.भ.प कल्याण महाराज जायभाय, संगीत विशारद गणेश महाराज देवकर, मृदुंगाचार्य गणेश महाराज चौधरी, व उद्धव डिघुळे, हरिभाऊ डीघुळे, विक्रम आप्पा, भाऊसाहेब नाब्दे, सुभाष डिघुळे, अशोक कदम, दादा पाटील डोईफोडे व समस्त गावकरी मंडळी भालगाव व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.