भगवान भक्तीगडावरील ‘दसरा’ मेळावा होणार ऑनलाईन

यंदाचा सावरगाव दसरा मेळावा ऑनलाईन, भगवान भक्तीगडावर न येण्याचे पंकजा मुंडेंचे आवाहन

0

बीड : भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे यावेळीही दसरा भगवान भक्तीगडावर होईल मात्र तो ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे सांगितले. संत भगवान बाबा यांची जन्मभूमी सावरगावातील दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने भक्तांनी सावरगावत येऊ नये, अशी माहिती मुंडे यांनी दिली.

दसरा मेळाव्याची परंपरा यावर्षी खंडित होणार नाही. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मेळावा ऑनलाईन होणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. भगवान भक्तीगडावर कोणीही गर्दी करू नये. घरातच राहून भगवान बाबांचे दर्शन घेण्याचे आवाहन मुंडेनी केली आहे.  दसऱ्याला भगवान भक्तीगडावर जाणार असून तिथे दर्शन घेतल्यानंतर समर्थकांना मार्गदर्शन करणार आहे. समर्थकांनी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन गावागावांमध्ये ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असेही पंकजा मुंडेंनी सांगतिले. भगवान भक्तीगडावर 2014 पासून पंकजा मुंडे यांच्या मार्फत दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. दरम्यान, भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप निर्माण झाला.पंकजा मुंडे यांनीदेखील एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. एकनाथ खडसे यांच्या भाजपमधून जाण्याने धक्का बसल्याचे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.