‘वंचित’चे राज्यभरात ‘डफली बजाव’ आंदोलन

सरकारने मालक होऊ नये, सक्तीचे लॉकडाऊन उठवावे : प्रकाश आंबेडकर

0

नागपूर : राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे बुधवारी राज्यभरात ‘डफली बजाव’ आंदोलन करण्यात आले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात नागपुरात ‘डफली बजाव’ आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक वाहतुकीसह छोटी दुकाने बंद ठेवण्याचे काहीच कारण नाही. लोकशाहीमध्ये जनता मालक असते. सरकारने मालक होण्याचा प्रयत्न करू नये. सरकारने सक्तीचे लॉकडाऊन उठवावे आणि लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्यावा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका स्तरावर करण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. आधी इतरांना दिशादर्शक असणारे महाराष्ट्र राज्य आता दुसऱ्यांच्या आदेशाचे पालन करणारे ठरले, असल्याची टीका त्यांनी केली. सरकार खासगी वाहतुकीला परवानगी देत आहे. याचा अर्थ खासगी वाहतुकीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना होत नाही. मग एसटीतील कर्मचाऱ्यांना कोरोना कसा होणार हे शासनाने सांगावे, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. दरम्यान, राज्यभरातदेखील वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. विविध ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी डफली वाजवत आंदोलन केले. पुण्यात एसटी महामंडळाचे विभागीय कार्यालय स्वारगेट येथील प्रवेशद्वाराजवळ तीव्र स्वरूपाचे ‘डफली बजाव’ आंदोलन करण्यात आले. या वेळी पुणे शहरातील वंचित आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या वेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विभागीय महाराष्ट्र राज्य परिवहन नियंत्रक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दुसरीकडे, साताऱ्यात बसस्थानकासमोर ‘डफली बजाव’ आंदोलन करण्यात आले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.