कोरोना संसर्गामुळे यंदा पहिल्यांदाच धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीला टाळे

धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साजरा करा, पालकमंत्री नितीन राऊतांचे आवाहन

0

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करा, असे आवाहन नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सर्व बौद्ध अनुयायांना केली आहे. कोरोनाच्या नियमांमुळे यंदा पहिल्यांदाच दसऱ्याच्या दिवशी दीक्षाभूमीवर टाळे लागले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सणांप्रमाणे यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिन, दसरा सणही साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्यामुळे राज्यभरात दसरा राज्य सरकारच्या नियमांचे पालन करून आणि सोशल डिस्टंसिंगची काळजी घेत घरीच साधेपणाने साजरा करावा. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून यंदा बौद्ध अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच, साधेपणाने साजरा करावा. घरातच तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून प्रशासनाला सहकार्य करावे”, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले नागपुरकरांना केले. आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी, दरवर्षी लाखो लोक दीक्षाभूमीवर येतात. पण यंदा कोरोनानुळे दीक्षाभूमीवरील सोहळा रद्द करण्यात आला. त्यामुळे बौद्ध बांधवांनी दीक्षाभूमीवर न येता, घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.