मलनिस्तारण प्रकल्प उभारणीसाठी सिडको अधिक्षक अभियंता यांच्या सोबत बैठक
मलनित्सारण प्रकल्प उभारणी साठी शिष्टमंडळासह सिडकोचे अधिक्षक अभियंता सुधाकर
विसाळे यांच्या सोबत शिवसेना विभाग प्रमुख नागेश कुठारे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली आहे. सिडको वाळुजमहानगर १ आणि २ ची उभारणी साठी गेली ३ दशकापासून सिडको ची नियुक्ती करण्यात आली. मात्र अद्यापही सिडको वाळुजमहानगर वाशीयांना मुलभुत सुविधा सिडकोकडून पुरविता आले नाही, त्यामुळे मलनिस्तारण प्रकल्प लवकर उभा करावा तर मलनित्सारण (ड्रेनेजचे) पाणी वाहून नेण्यासाठी पंपिंग स्टेशनचे काम वसाहत नसणाऱ्या जागेवर करावे आदि विषयांवर बैठकीत चर्चा झाली.