‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’च्या प्र.कुलगुरुपदी डॉ.शाम शिरसाठ
प्र.कुलगुरुपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ.शिरसाठ यांचे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने अभिनंदन
औरंगाबाद : राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी सदर नियुक्ती केल्याचे पत्र विद्यापीठास बुधवारी प्राप्त झाले. ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’च्या प्र. कुलगुरुपदी प्राचार्य डॉ.शाम शिरसाठ
यांची नियुक्ती करण्यात आली असून कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी त्यांचे अभिनंदन केले.
‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’च्या प्र. कुलगुरुपदी प्राचार्य डॉ.शाम शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी सदर नियुक्ती केल्याचे पत्र विद्यापीठास बुधवारी प्राप्त झाले. मूळचे फुलंब्री (जि.औरंगाबाद) येथील रहिवासी असलेले डॉ.शाम शिरसाठ हे सध्या विवेकानंद महावि़द्यालयात प्राचार्यपदी कार्यरत आहेत. ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’च्या लोकप्रशासन विभागातून तीन वर्षांपूर्वी प्राध्यापकपदावरुन त्यांनी धारणाधिकार (लिन) घेतला आहे. लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच विद्या परिषदेचे सदस्य म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. डॉ.प्रवीण वक्ते यांच्याकडून प्रकुलगुरुपदाची सुत्रे ते लवकरच स्वीकारणार आहेत. यापूर्वी डॉ.अशोक तेजनकर यांनी (२६ फेब्रुवारी २०१८ ते ३ जून २०१९ ) या दरम्यान काम पाहिले. तर डॉ.प्रवीण वक्ते हे ६ ऑगस्ट २०१९ पासून प्रभारी प्र. कुलगुरुपदावर कार्यरत आहेत. दरम्यान, प्र.कुलगुरुपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ.शिरसाठ यांचे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांनीही अभिनंदन केले.