‘नामिबिया विज्ञान विद्यापीठा’च्या सल्लागार समितीवर डॉ.रत्नदीप देशमुख नियुक्त

डॉ.रत्नदीप देशमुख यांंच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनपर शुभेच्छा !

0

औरंगाबाद : ‘नामिबिया विज्ञान व तंत्रज्ञान, नामिबिया‘ या विद्यापीठाच्या माहिती विज्ञान डेटा सायन्स या अभ्यासक्रमाच्या सल्लागार समितीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ.रत्नदीप देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ.रत्नदीप देशमुख यांची‘नामिबिया विज्ञान व तंत्रज्ञान, नामिबिया‘ या विद्यापीठाच्या माहिती विज्ञान डेटा सायन्स या अभ्यासक्रमाच्या सल्लागार समितीवर नियुक्ती केली आहे. उद्योग आणि शिक्षण यांचे एकत्रीकरण, संशोधन, समस्या सोडवणे आणि विद्याथ्र्यांची नियुक्ती सामायिकरण प्रयोगात विद्यापीठ आणि उद्योग यांच्यात संशोधन भागीदारी स्थापित करणे तसेच सदरील अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षक नेमणे व उद्योग समूहाशी सामंजस्य करार करणे यासाठी सदर सल्लागार समिती नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदरील नियुक्तीचे पत्र नामिबिया विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.अँड्र यू नीकोन्डो यांनी प्राध्यापक देशमुख यांना पाठविले आहे. नियुक्तीबद्दल कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, उपकुलगुरू डॉ.श्याम शिरसाठ व कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.