डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठत विध्यार्थी संघटनांचे अदोलन
औरंगाबाद : जमिया इस्लामीया विद्यापीठात बिलाविरोध निदर्शने करणाऱ्या विध्यार्थ्यांना व झालेला लाठीचार्ज या विरोधात बामु विद्यापीठातील सर्व विध्यार्थी संघटना नि शैक्षणिक बंद ची हाक देत सरकारच्या विरोधात रणशिंग फुकले.
विध्यार्थ्यांना हॉस्टेल व विद्यापीठ परिसरात घुसून दिल्ली पोलिसांनी गोळीबार करत लाठीचार्ज केला,यात विध्यार्थी गंभीर जखमी झाले.हा प्रकार संविधानिक अधिकाराचा उल्लंघन करणारा असल्याने या विरोधात सर्व विध्यार्थी संघटनांनी शैक्षणिक बंद ची हाक दिली. या बंद मध्ये एमआयएम विध्यार्थी संघटना,पँथर्स रिपब्लिक विध्यार्थी आघाडी,राष्ट वादी विध्यार्थी संघटना,समता विध्यार्थी संघटना,आझाद युवा ब्रिगेड या संघटना ,तसेच प्रा प्रकाश इंगळे,कुणाल खरात,अमोल दांडगे,अमोल घुगे,नितीन वाहुले,राजू पठाण आदी चा सहभाग होता.