पदवीधर निवडणुकीसाठी माझा फोटो वापरू नका; संभाजीराजेंचा उमेदवारांना इशारा

पदवीधर निवडणूक प्रचारात उमेदवारांनी माझ्या संमतीशिवाय माझा फोटो वापरु नये", असे आवाहन

0

मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या तीन पदवीधरच्या आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाची तर अमरावती आणि पुणे विभागाच्या शिक्षक मतदारसंघांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या नेत्यांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, या प्रचारामध्ये काही उमेदवार भाजप खासदार संभाजीराजे यांच्या संमतीशिवाय त्यांच्या फोटोचा वापर करत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे.

पदवीधर मतदारसंघाची तर अमरावती आणि पुणे विभागाच्या शिक्षक मतदारसंघांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या नेत्यांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, या प्रचारामध्ये काही उमेदवार भाजप खासदार संभाजीराजे यांच्या संमतीशिवाय त्यांच्या फोटोचा वापर करत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे.उमेदवारांनी आपली संमती न घेता प्रचारात फोटो वापरल्याने संभाजीराजे यांनी ट्विटरवर याबाबत आक्षेप नोंदवला आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी संमतीशिवाय फोटोचा वापर करू नये, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे. “विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघांची निवडणूक प्रक्रिया सुरू असून या निवडणूकीत काही उमेदवार माझ्या संमतीशिवाय माझ्या फोटोचा वापर करून प्रचार करत आहेत. कोणत्याही उमेदवारांनी माझ्या फोटोचा प्रचारासाठी वापर करू नये”, असे संभाजीराजे ट्विटरवर म्हणाले. संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटचा फोटो फेसबुकवरदेखील शेअर केला आहे. दरम्यान, संभाजीराजे यांच्या संमतीशिवाय कोणत्या उमेदवाराने प्रचारासाठी त्यांच्या फोटोचा वापर केला? असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना फेसबुकवर त्यांच्या पोस्टला कमेंट करत विचारला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.