मला दानवेंचा जावई म्हणू नका, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा घटस्फोटासाठी अर्ज

कुटुंब न्यायालयात संजना जाधव यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल

0

औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कौटुंबिक त्रासाला कंटाळून घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. कुटुंब न्यायालयात संजना जाधव यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती जाधवांनी दिली.
भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा जावई म्हणून मला कोणीही संबोधू नये, अशी विनंतीही हर्षवर्धन जाधव यांनी केली. पत्नी संजना जाधव यांच्याशी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली असल्याचेही जाधवांनी सांगितले.
कौटुंबिक त्रासाला कंटाळलो आहोत, रावसाहेब दानवे यांच्यामुळेही त्रस्त झाल्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेतल्याची माहिती हर्षवर्धन जाधव यांनी दिली. आपल्या जिवाला धोका असल्याचा पुनरुल्लेख हर्षवर्धन जाधव यांनी केला. हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेत आपल्या पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. हर्षवर्धन जाधव दोन वेळा कन्नडचे आमदार राहिले आहेत. रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे दोघे मिळून आपल्याला वेडे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. “रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी ‘हर्षवर्धन वेडा आहे’ हे सिद्ध करायचा विडा उचलला आहे. एकदा हे सिद्ध झाले तर मग तो काहीही बोलला तरी फरक पडणार नाही, असे त्यांचे षडयंत्र सुरू आहे”, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. “रावसाहेब दानवे यांच्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. त्यांनी माझ्याविरोधात अॅ ट्रॉसिटी गुन्हा दाखल करून घेतला. त्यांच्या त्रासामुळे मी अंतूर किल्ल्यावर आत्महत्या करण्यासाठी गेलो होतो”, असे गंभीर आरोपही हर्षवर्धन जाधव यांनी केले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.