बँकेची कामे करा तीन दिवसांत, नाहीतर सोमवारपर्यंत थांबावे लागणार

या आठवड्यात सलग तीन दिवस बँकांना सुट्टी

0

मुंबई : तुम्हाला बँकेत जाऊन महत्त्वाची कामे करायची असतील, तर तीन दिवसांत आटोपून घ्या; अन्यथा तुम्हाला थेट सोमवारपर्यंत थांबावे लागणार आहे. कारण या आठवड्याच्या अखेरीस सलग तीन दिवस बँकांना सरकारी सुट्टी आहे.

गुरुवार 24 डिसेंबरपर्यंत बँकेची कामे न उरकल्यास सोमवार 28 डिसेंबरपर्यंत थांबावे लागेल. सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे प्रत्यक्ष बँकेत जाऊन करायची कामे ग्राहकांना येत्या गुरुवारपर्यंतच उरकून घ्यावी लागतील. शुक्रवार 25 डिसेंबरला नाताळनिमित्त बँकांना सुट्टी असेल. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी येणारा शनिवार हा ‘फोर्थ सॅटर्डे’ आहे. त्यामुळेच 26 डिसेंबरलाही बँका बंद असतील. तर 27 डिसेंबरला रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळे बँका उघडणार नाहीत. अशाप्रकारे या आठवड्यात सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असेल.

ज्या ग्राहकांना बँकेत जाऊन पैसे काढणे, भरणे, चेक जमा करणे अथवा अन्य महत्त्वाची कामे करायची आहेत, त्यांनी ती गुरुवारपर्यंत करणे महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थात या कालावधीत ऑनलाईन व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे शुक्रवार ते रविवार हे तीन दिवस बँका बंद असतानाही तुम्ही ऑनलाईन ट्रँझॅक्शन सुरळीतपणे करू शकाल. वर्षाच्या अखेरीस अनेक जण मोठ्या सुट्ट्यांचे नियोजन करतात. वर्षभर साचलेल्या सुट्ट्या डिसेंबर महिन्यात संपवण्याची सवय अनेक जणांना असते. थंडीच्या मोसमात सहकुटुंब किंवा मित्र परिवारासोबत पर्यटनाची आखणी अनेक जण करतात. डिसेंबरचा शेवटचा आठवडा त्यामुळेच पर्वणी ठरत आहे. गुलाबी थंडीला लाँग वीकेंडची जोड मिळाल्यामुळे बहुतांश जणांनी विंटर हॉलिडेजचे प्लॅनिंग केले आहे. या लाँग वीकेंडआधीच बँकेशी संबंधित कामे तुम्हाला उरकावी लागणार आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.