कोरोना रुग्णांच्या घरांबाहेर कोव्हिडचे पोस्टर लावू नका, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

....हा नियम नाही, तर इतरांच्या संरक्षणाची व्यवस्था

0

नवी दिल्ली  : कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांना होम क्वारंटाइन करण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  न्यायालयाने म्हटले आहे की, लोकांच्या घरासमोर क्वारंन्टाईन पोस्टर्स लावू नका. या प्रकरणातील गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत  न्यायालयाने म्हटले होते की, एकदा कोरोना रूग्णांच्या घरी पोस्टर लावण्यात आले तेव्हा त्यांना अस्पृश्यांप्रमाणे वागवले जाते.

सरकारचे उत्तर – हा नियम नाही, तर इतरांच्या संरक्षणाची व्यवस्था आहे

केंद्र सरकारने न्यायालयात म्हटले की, हा आवश्यक नियम नाही, या प्रथेचा हेतू कोरोना रूग्णांना कलंकीत करणे हा नाही, तर ही व्यवस्था इतरांच्या सुरक्षेसाठी आहे. सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, कोरोना संसर्ग रोखण्याच्या प्रयत्नात काही राज्ये ही पद्धत अवलंबत आहेत.

न्यायालयाने सांगितले- वास्तव वेगळे…

सरकारच्या या उत्तरावर न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी आणि एमआर शाह यांच्या खंडपीठाने असे सांगितले की, वास्तव काही वेगळे आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 5 नोव्हेंबरला केंद्र सरकारला म्हटले होते की, कोरोना रुग्णांच्या घराबाहेर पोस्ट लावण्यापासून रोखण्यासाठी गाइडलाइंस जारी करण्यावर विचार करायला हवा. या प्रकरणात पिटीशनर कुश कालरा यांनी ही अपील केली होती. मात्र  न्यायालयाने सरकारला नोटीस जारी न करता निर्देश दिले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.