पाटोद्यात 750 कुटुंबीयांना निम्म्या भावात साखर वाटून दिवाळी गोड

औरंगाबाजवळील आदर्श गाव पाटोद्याचा स्तुत्य उपक्रम,

0

औरंगाबाद  : औरंगाबादजवळील पाटोदा ग्रामपंचायतीने आदर्श गाव म्हणून नावलौकिक मिळवलेल्या  गावात ७५० कुटुंबीयांना अर्ध्या किमतीत म्हणजेच २० रुपये किलोप्रमाणे प्रतिकुटुंब २५ किलो साखर वाटून ग्रामस्थांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. या गावात शंभर टक्के कर भरणाऱ्यांना मोफत दळण, पिण्याचे शुद्ध पाणी व गरम पाणीही मोफत दिले जाते. कोरोनाचे संकट घोंगावताना सर्व ग्रामस्थांनी १०० टक्के कर भरल्याने त्यांना ही गोड दिवाळी भेट देण्यात आल्याचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी सांगितले.

 पाटोदा ग्रामपंचायतीने आदर्श गाव म्हणून नावलौकिक  आहे. या गावात शंभर टक्के कर भरणाऱ्यांना मोफत दळण, पिण्याचे शुद्ध पाणी व गरम पाणीही मोफत दिले जाते. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा हे गाव औरंगाबादपासून १२ किलोमीटरच्या अंतरावर आहे. पेरे पाटील यांच्या कल्पनेतून अनोखी दिवाळी साजरी करण्याचा निश्चय करण्यात आला होता. बाजारात ४० रुपये किलोप्रमाणे मिळणारी साखर पेरे यांनी लातूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून २८ रुपये किलोप्रमाणे १०० क्विंटल विकत घेतली. यासाठी ग्रामपंचायतीला ३ लाख रुपयांचा खर्च करावा लागला. कारखान्याकडून साखर घेतल्यानंतर वाहतूक खर्च धरून ग्रामपंचायतीला ३० रुपये किलोप्रमाणे साखर मिळाली. जमा झालेल्या कराच्या रकमेतून प्रतिकिलोमागे १० रुपयांची भरपाई करत ही साखर ग्रामस्थांना वाटण्यात आली. याबाबत बोलताना ग्रामविकास अधिकारी पी. एस. पाटील म्हणाले की, कोरोनामुळे गावकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. दिवाळीसारखा सण गोड व्हावा, या उद्देशाने साखरवाटपाचा उपक्रम राबवला. यासाठी प्रशासक कमल मगरे, माजी सरपंच भास्कर पाटील पेरे, माजी उपसरपंच विष्णू राऊत यांनी परिश्रम घेतले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.