मोदी सरकारचे 30 लाख कर्मचाऱ्यांना दिवाळी गीफ्ट

दसऱ्यापर्यंत प्रत्येकाच्या खात्यावर बोनस होणार जमा

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रिय मंत्रिमंडळाने आज 30 लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीचे गीफ्ट दिले आहे. मोदींच्या कॅबिनेटने आज 2019-2020 साठी प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (पीएलबी) आणि नॉन-प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसला मंजुरी दिली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयांबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3,740 कोटी रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. 30 लाख कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम दसऱ्यापर्यंत त्यांच्या खात्यावर जमा झालेली पाहायला मिळेल. केंद्र सरकारने रेल्वे, टपाल, संरक्षण, ईपीएफओ, ईएसआयसी सारख्या वाणिज्यिक आस्थापनांमधील विना-राजपत्रित कर्मचार्‍यांना 2019-2020 साठी प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस  देण्यास मान्यता दिली आहे. यावर 2,791 कोटी रुपये खर्च होणार आहे. केंद्र सरकारच्या विना-राजपत्रित कर्मचार्‍यांना नॉन-पीएलबी किंवा अ‍ॅडहॉक बोनस मंजूर करण्यात आले आहेत. याचा फायदा 13.70 लाख कर्मचार्‍यांना होईल आणि त्यावर एकूण 946 कोटी रुपये खर्च होणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 12 ऑक्टोबर रोजी सणासुदीच्या आधी अर्थव्यवस्थेला 73,000 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. एलटीसी कॅश व्हाउचर योजना आणि केंद्र सरकार तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी विशेष फेस्टीव्हल अ‍ॅडव्हान्स स्कीम या दोन योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.