महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंत्यांची दिवाळी गोड, ऊर्जामंत्र्यांकडून नियुक्तीचे आदेश

वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आल्याची घोषणा - ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

0

मुंबई : वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत  यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. महावितरणामध्ये भरतीसाठी पात्र ठरलेल्या 368 कनिष्ठ अभियंत्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्याच्या सूचना ऊर्जामंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे गेले वर्षभर आपल्या नियुक्ती आदेशाची वाट बघणाऱ्या तब्बल 368 जणांना ऐन दिवाळीत गोड बातमी मिळणार आहे.

महावितरण कंपनीत गेल्या वर्षी भरती करण्याच्या दृष्टीने कनिष्ठ अभियंता या पदाकरिता निवड परीक्षा घेण्यात आली होती. यानंतर परीक्षेतील गुणवत्तेनुसार निवड यादी करून सुमारे 368 पात्र उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. मात्र, कोरोनामुळे या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले नव्हते. पण आता या सर्व पात्र उमेदवारांना नियुक्ती व पदस्थापना देण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले. यासाठी ऊर्जा सचिव व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता हे आदेशाची अमंलबजावणी करणार आहेत. या आदेशामुळे सर्व नवनियुक्त अभियंत्यांची दिवाळी गोड होणार आहे. गेल्या वर्षी महावितरणने सरळ 327 तर अंतर्गत भरतीद्वारे 41 कनिष्ठ अभियंत्यांची निवड केली होती. कोरोनामुळे या सर्व पात्र उमेदवारांना कागद पडताळणी होऊनही नियुक्ती आदेशाकरिता वाट पहावी लागली. त्यातच महावितरणच्या बिल वसुलीवर कोरोनाचा मोठा प्रभाव पडल्याने कंपनीची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. साहजिकच या सर्वाचा प्रभाव नवीन नियुक्तीवर झाला होता. मात्र, आता ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी नियुक्ती आदेश देण्याच्या सूचना दिल्या असल्याने या सर्व कनिष्ठ अभियंत्यांच्या नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूणच या सर्व अभियंत्यांची दिवाळी गोड होणार आहे. दरम्यान, वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आल्याची माहितीही नितीन राऊत यांनी ट्विट करत दिली. लॉकडाऊन काळात वीजपुरवठा करण्यात, निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली वीज वितरण यंत्रणा उभारण्यात, ठप्प झालेला मुंबईचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात ऊर्जा विभागाने मोठी भूमिका वठवली. हे लक्षात ठेवून ऊर्जा विभागाच्या कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बोनसची दिवाळी भेट जाहीर केल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.