राज्य मैदानी स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी १५ जानेवारीला
मिलिंद महाविद्यालयामधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात शुक्रवारी सकाळी ९ वाजता
औरंगाबाद : अॅथलेटिक्सची राष्ट्रीय ज्युनियर मैदानी स्पर्धा ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान गुवाहाटी आसाम येथे होत असून त्याकरिता राज्य मैदानी स्पर्धा १८ ते २२ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे.
ज्युनिअर गटाच्या राज्य स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याची निवड चाचणी शुक्रवारी १५ जानेवारीला सकाळी ९ वाजता मिलिंद कॉलेज मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात शासनाच्या नियमांचे व एस.ओ.पी.चे पालन करीत आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा निवड चाचणी नि :शुल्क असून निवड झालेल्या खेळाडूंना मात्र राज्य संघटनेच्या नियमा प्रमाणे शुल्क भरावे लागेल तसेच भारतीय अॅथलेटिक्स महासंघाकडे ऑनलाईन खेळाडू रजिस्ट्रेशन करून युआयडी क्रमांक मिळविणे अनिवार्य असेल व त्याशिवाय त्याला राज्य स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. या बाबत जिल्हा असोसिएशनचे तांत्रिक अधिकारी अनिल निळे मार्गदर्शन करतील. या ज्युनिअर गटामध्ये १४, १६, १८ व २० वयोगटांच्या समावेश असून सहभागासाठी मूळ जन्मदाखला, आधार कार्ड व पालकाचे समतीपत्रा बरोबरच खेळाडूंनी येतांना मास्क घालूनच यावे, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आमदार श्रीकांत जोशी, कार्याध्यक्ष डॉ.रंजन बडवणे, उपाध्यक्ष शशिकला निळवंत सचिव डॉ.फुलचंद सलमापुरे आणि कोषाध्यक्ष मोहन मिसाळ यांनी केले आहे.