जिल्हा सायकल संघटनेच्या वतीने ‘कार मुक्त दिवस’ साजरा

वायूूप्रदूषण, इंधन वाचविणे व ट्रॅफिक रोखण्यासाठी कार ऐवजी सायकल चालविण्याचा संदेश

0

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेने कारमुक्त दिवस मंगळवार राेजी साजरा केला. कार फ्री डे प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये साजरा हाेताे. कार मुळे होणाऱ्या वायूू प्रदूषण, इंधन वाचण्यासाठी व ट्रॅफिक रोखण्यासाठी गाडी चालवणे ऐवजी सायकल चालवा, असा संदेश जिल्हा सायकल संघटनेने यावेळी सायकल रॅलीतून दिला.

शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या वाढतच चालली आहे. कार मुळे होणाऱ्या वायूू प्रदूषण, इंधन वाचविण्यासाठी व ट्रॅफिक रोखण्यासाठी गाडी चालवणे ऐवजी सायकल चालवा, असा संदेश जिल्हा सायकल संघटनेने यावेळी सायकल रॅलीतून दिला. त्यावर एकच उपाय म्हणजे नागरिकांना सायकल चालविण्याासाठी प्रोत्साहन देणे महत्त्वााचे आहे, असे संघटनेचे सचिव चरणजीत सिंग संघा यांनी सांगितले. सायकल रॅली सायकल बेट, सेव्हन हिल येथून केंब्रिज शाळा व परत सायकल बेट येथे समारोप झाला. या राईमध्ये संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर सचिव चरणजित सिंग संघा सहसचिव अतुल जोशी, आयरन मॅन निकेत दलाल, अभिजीत कुलकर्णी, उन्मेष मारवाडे, विनय देव, राजकुमार मालानी,अभिजीत आर. राऊत, पीयुष सेठी, रावी बिनाके, सागर सूर्यवंशी, अब्दुल रहमान सिद्दीकी आदींनी सहभाग नाेंदवला हाेता.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.