चर्मकार समाजातील गटाई कामगारांना ‘बैठे पीच’ परवान्याचे वितरण

'बैठे पीच' परवाना वितरण औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते

0
 औरंगाबाद : चर्मकार समाजातील गटाई कामगारांना बैठे पीच परवाना वितरणाची सुरुवात औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते आयुक्त दालनात करण्यात आली.
औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे गटाई कामगारांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून परवाने वितरित करण्याची सुरुवात झाली आहे.  याबरोबरच पथविक्रेता सर्वेक्षणानंतरच्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करत हॉकर्स झोन निश्चित करण्याची निविदा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती विधी सल्लागार अपर्णा थेटे यांनी दिली. ज्या कामगारांनी अजूनपर्यंत सर्वेक्षणात नोंदणी केलेली नाही त्यांनी संबंधित वॉर्ड कार्यालयात नोंद करून घ्यावी, असे आवाहन महानगरपालिके तर्फे करण्यात आले आहे. गटाई कामगारांचे आतापर्यंत एकूण 350 परवाने तयार झाले असून पांडेय यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन गटाई कामगारांना परवाने वितरित करण्यात आले.यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेश अध्यक्ष संजय खामकर, बावस्कर,वाघमारे,राजू गायकवाड यांची उपस्थिती होती. या वेळी त्यांनी प्रशासकांचेे आभार मानले व त्यांचा सत्कार केला. काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पथविक्रेता सर्वेक्षणानंतर हॉकर्स झोन निर्मितीबाबत पाऊले उचलली जात आहेत.नियमानुसार रुग्णालय, मंदिर, मशीद यांजवळ पथविक्रेते असू नये. त्यामुळे या बाबींचा विचार करून हॉकर्स झोन निश्चित केले जाणार आहेत. त्यानंतर अतिक्रमण केलेल्या पथविक्रेत्यांना सदर जागेत हलवले जाईल. अशी माहिती विधी सल्लागार अपर्णा थेटे यांनी दिली.
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.