‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने पेढे वाटप; मंदिर उघडण्याच्या निर्णयाचे स्वागत

वंचित बहुजन आघाडी'चे प्रकाश आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील सर्व मंदिरे उघडण्याच्या आंदोलनाला यश

0

औरंगाबाद : ‘वंचित बहुजन आघाडी’चे प्रकाश आंबेडकर यांनी मोठे पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात यावे म्हणून आंदोलन केले होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून सोमवारी ( ता. 16) मंदिर उघडण्यात आली. आंदोलनाला यश मिळाले म्हणून ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने वाळूज पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात मिठाई वाटण्यात आले.

‘वंचित बहुजन आघाडी’चे प्रकाश आंबेडकर यांनी मोठे पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात यावे म्हणून आंदोलन केले  होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून सोमवारी ( ता. 16) मंदिरे उघडली. आंदोलनाला यश मिळाले म्हणून ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने वाळूज पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात मिठाईचे  वाटप करण्यात आले. तसेच वारकरी गावकरी यांच्यासमवेत आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा परिषद सदस्य पी. के. दाभाडे, अ‍ॅड संतोष लोखंडे,श्रीरंग ससाणे,अ‍ॅड रवी तायडे ,भाऊराव गवई बाबासाहेब वक्ते, प्रविण जाधव, भैयासाहेब जाधव, सतीश गायकवाड, तालुकाध्यक्ष ढेहरे, अमृतराव डोंगरदिवे यांची प्रमुख उवस्थिती होती

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.