देवेंद्र फडणवीसांशी भांडण, पण मी भाजपसोबतच- महादेव जानकर

भाजपवर नाराज तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या भाजपमध्येच आहोत आणि पुढेही राहणार

0

बारामती : महाराष्ट्रातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.माझे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे मी भाजपसोबतच राहणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले आहे. जानकर आज बारामतीत एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याच्या कामासंदर्भात ही भेट होती, असे जानकरांनी स्पष्ट केले आहे. भाजपवर आपण नाराज असलो तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या भाजपमध्येच आहोत आणि पुढेही राहणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचे नसते, असेही जानकर म्हणाले. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न सुरूच असल्याचे जानकरांनी सांगितले. माझे आणि देवेंद्र फडणवीसांचे भांडण सुरू आहे. पण त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे आपण भाजपमध्येच राहणार असल्याचे जानकर म्हणाले.

आमदार गोपीचंद पडळकरांना टोला
धनगर समाजाचे नेते, अशी ओळख असलेल्या जानकरांना डावलून फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांना जवळ केल्याने जानकर नाराज आहेत. पण माझा जिल्हाध्यक्ष जेवढा प्रबळ आहे, तेवढा तो नाही, अशा शब्दात जानकरांनी आमदार गोपीचंद पडळकर यांनाही टोला लगावला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.