12 व्या बैठकीनंतर चर्चा बंद : ‘निर्णय होऊ शकला नाही, याचे आम्हाला दुःख
आमच्या प्रस्तावांवर निर्णय घ्या, यापुढे बैठका होणार नाही; केंद्र सरकारची शेतकऱ्यांना स्पष्टोक्ती
नवी दिल्ली : कृषी कायद्यावरील शेतकरी आणि सरकारमधील बैठका आता बंद झाल्या आहेत. आज 12 व्या बैठकीतही कोणताही तोडगा न निघाल्यामुळे पुढील बैठकीसाठी कोणतीही तारीख ठरवण्यात आली नाही. तसे पाहता, बैठक पाच तास चालली, पण शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांची समोरासमोर चर्चा 30 मिनिटेही झाली नाही. शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले की, सरकारने आम्हाला त्यांच्या प्रस्तावावर विचार करण्यास सांगितले आहे. सरकारकडून आता बैठका होणार नाहीत. हीच बाब कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी देखील सांगितली.
बैठकीत सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेचा अंदाजा मजुर संघर्ष समितीचे एस.एस. पंढेर यांच्या प्रतिक्रियेवरून लावला जाऊ शकतो. ते म्हणाले की, ‘कृषी मंत्र्यांनी आम्हाला साडेतीन तास वाट पाहाला लावली. हा आमचा अपमान आहे. यानंतर आल्यावर आम्हाला म्हणाले की, सरकारचे म्हणणे ऐका. आता आम्ही बैठका घेणे बंद करणार आहोत. त्यामुळे आम्ही यापुढे शांतीपूर्ण पद्धतीने आमचा विरोध सुरूच ठेवणार. ‘
निर्णय होऊ शकला नाही, याचे आम्हाला दुःख
बैठकांनंतर कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, ‘आम्ही शेतकऱ्यांसोबत 12 बैठका घेतल्या. जेव्हा शेतकरी कायदे परत घेण्यावर अडून होते, तेव्हा आम्ही त्यांना अनेक पर्याय दिले. आजही आम्ही त्यांना म्हणालो, सर्व पर्यायांवर विचार करुन आपला निर्णय सांगावा. इतक्या बैठका घेऊनही निर्णय झाला नाही, याच आम्हाला दुःख आहे. इतक्या बैठकानंतरही तोडगा निघत नाही म्हणजे, यामागे कोणतीतरी शक्ती आहे, जे शेतकऱ्यांचा वापर करुन आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या मागणीवर निर्णय होऊ शकणार नाही.’