दिवाळीत फटाकेबंदीवरून मंत्र्यांमध्ये मतभेद, मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

उपमुख्यमंत्री यांची फटाके बंदीची आग्रही भूमिका, त्याच्या भूमिकेस काहीजणांचा आक्षेप

0

मुंबई : कोरोनाची लाट  त्यात आलेली दिवाळी  आणि थंडीची लागलेली चाहूल यामुळे राज्यात फटाक्यांवर बंदी आणावी, अशी मागणी काही मंत्र्यांनी केली होती. मात्र यावरून मंत्र्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी कॅबिनेटच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यात काही मंत्र्यांनी फटाक्यांवर बंदी घालावी ही मागणी केली तर काहीनी त्यावर आाक्षेप घेत विरोध केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटाके बंदी करावी ही आग्रही भूमिका घेतली. त्याच्या भूमिकेस काहीजणांनी आक्षेप घेतला. दिवाळी काही दिवसांवर आली आहे. फटाके व्यावसायिकांनी यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. अचानक असा निर्णय घेतला तर त्यांना फटका बसेल, अशी शक्यता व्यक्त केली. आरोग्यमंत्री राजेश टोपे सुद्धा फटाकेबंदी करावी या मताचे असल्याचे संकेत त्यांनीच दिले होते.

राज्य सरकार गृह विभागाच्या दिवाळीसाठी पाच मार्गदर्शक सूचना  जारी

दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी., दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे.,सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा., धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही. त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा. दरम्यान, कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी, असा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा प्रयत्न आहे. हिवाळ्यात आधीच प्रदूषणात वाढ होते. त्यात फटाक्यामुळे जास्त प्रदूषण होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतरच दुसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने राज्य सरकार सावध झाले आहे

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.