धुळ्याच्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सावळागोंधळ उघडकीस
महाविद्यालयात जैविक विल्हेवाट यंत्र तरी खासगी संस्थेला लाखो रुपये देऊन विल्हवाट
धुळे : हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. महाविद्यालयात जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणारे यंत्र आहे तरी खासगी संस्थेला वर्षाकाठी लाखो रुपये देऊन कचऱ्याची विल्हवाट करण्यात येत आहे.
रुग्णालयामध्ये जैविक कचऱ्याची समस्या होती. त्यामुळे २०१६-२०१७ मध्ये सुसज्ज जैविक घनकचरा भस्मीकरण यंत्र उभारण्यात आले. मात्र सुरुवातील वीज पुरवठा नसल्यामुळे यंत्र बंद ठेवले. त्यानंतर वीज पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र तरीही कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी खासगी संस्थेला हे काम देण्यात येते आहे. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आपल्या कारभारात काही केल्या सुधारणा करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. कोरोना लागण झालेला एक रुग्ण या रुग्णालयातून आपल्या कुटूंबासह पळून गेला होता. विशेष म्हणजे या आधीही सात संशयित रुग्णालय सुरक्षेला खो देत पळून गेले होते. काही दिवसापूर्वी दोन मृदेहांची अदलाबदल ही याच रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे झाली होती.